सासवड येथे शिवसेनेकडून रस्त्याच्या खड्ड्या संदर्भात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड येथे शिवसेनेकडून रस्त्याच्या खड्ड्या संदर्भात आंदोलन
सासवड येथे शिवसेनेकडून रस्त्याच्या खड्ड्या संदर्भात आंदोलन

सासवड येथे शिवसेनेकडून रस्त्याच्या खड्ड्या संदर्भात आंदोलन

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २१ ः हडपसर-सासवड-जेजुरी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ अक्षरशः खड्ड्यात गेला असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचा टोकाचा निष्काळजीपणा दाखवीत असल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने, रस्त्यांवरील खड्डयांबाबत जोरदार आंदोलन करण्यात आले. तेव्हा ‘कारणे नकोत, न्याय हवा’. ‘खड्डेमुक्त रस्ते झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सासवड (ता.पुरंदर) येथील एस. टी. स्टँड समोरील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही. तोपर्यंत तेथील अपघात, वैद्यकीय खर्च, जोखीम यांची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास प्रत्येकी एक कोटीचा अपघाती विमा काढून द्यावा. कुठली जीवितहानी झाली तर मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आणि इन्चार्ज असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. दर्जेदार काम करणारी यंत्रणा ताबडतोब नियुक्त करावी, अशा मागण्या तालुका प्रमुख अभिजित मधुकर जगताप यांनी यावेळी केल्या. सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगताप, कुणाल जगताप, राजेंद्र धोत्रे, विकास नाळे, प्रशांत शेंडकर, सचिन देशमुख,
बाळासाहेब रणावरे, संजय चाचर, राजाभाऊ क्षिरसागर, शांताराम जगदाळे, विजय कुंभारकर, दीपक बनकर, राजाभाऊ कुदळे, राहुल यादव, दीपक दळवी, अजय भोसले, दादा झिंजूरके, संतोष खैरे, सचिन पवार, वैभव कोलते, प्रशांत पुरंदरे, राजेंद्र खेनट, अक्षय गायकवाड, आकाश जगताप, तेजस कदम, पोपट कुमकर, सतीश डोंगरे आदी उपस्थित होते. संकेत जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.