खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलन
खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलन

खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलन

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २३ ः खानवडी (ता. पुरंदर) येथे १५ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ दिंडी, संमेलन उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कथा कथन, कविसंमेलन, पुरस्कार वितरण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी २७ नोव्हेंबर रोजी हे आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने आयोजन केले जाते. सकाळी ११ वाजता उद्‍घाटन होणार असून दुपारी २ वाजता ‘समाजसुधारक महात्मा फुले’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. संयोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला राजा जगताप, सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, श्यामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, रवींद्र फुले, दत्ता होले, विजय तुपे, प्रा. सुरेश वाळेकर, दीपक पवार, संजय सोनवणे उपस्थित होते. संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक यांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.