कोडीत येथील खूनप्रकरणी दोघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडीत येथील खूनप्रकरणी दोघे ताब्यात
कोडीत येथील खूनप्रकरणी दोघे ताब्यात

कोडीत येथील खूनप्रकरणी दोघे ताब्यात

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २८ ः कोडीत ते गराडे रस्त्यालगत गायरान जमिनीवर शिवम रामानुज आदिवासी याच्या हत्येचा छडा सासवड पोलिसांनी २४ तासांत लावून दोन संशयितांना गजाआड केले आहे.
कोडीत (ता. पुरंदर) येथील गायरानात शिवम रामानुज आदिवासी (वय २०, रा. गराडे, मूळ रा. मध्यप्रदेश) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिस तपास करताना शिवम, समाधान दत्ता अंकुरवाड, मुकेश रामसंजीवन कोल हे तिघेजण बाजार करण्याकरिता सासवडला गेले होते, परंतु त्याच दिवशी शिवम मयत अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी समाधान व मुकेश यांना ताब्यात घेवुन सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की,
सासवडवरून गराडेच्या दिशेने जात असताना कोडीतच्या गायरान जमिनीवर एकत्र बसून ते दारू प्याले. त्यावेळी तिघांमध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने शिवमला त्यांनी काठीने मारहाण केली त्यामध्ये तो मयत झाला.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, सहायक फौजदार सुनील चिखले, प्रमोद भोसले, पोलिस हवालदार जब्बार सय्यद, सूरज नागरे, प्रतीक धिवार, बापू म्हेत्रे, सुहास लाटणे, वैभव नगरे, अमोल लडकत यांनी केली.