शेतकरी, व्यापारी यांच्यातील मिटला वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी, व्यापारी यांच्यातील मिटला वाद
शेतकरी, व्यापारी यांच्यातील मिटला वाद

शेतकरी, व्यापारी यांच्यातील मिटला वाद

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ५ : सासवड येथे सकाळी ८ ते ११ या काळात राजेंद्र पेट्रोल पंपासमोर पालखी महामार्गावर सीताफळाचा बाजार भरला जातो. या बाजारात शेतकरी व व्यापारी यांच्यात तांत्रिक वाद सुरू होता. पण ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्यावतीने यात लक्ष घालून समन्वयातून हा वाद मिटविण्यात आला आहे, अशी माहिती ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे यांनी दिली.
शेतकरी कॅरेटमध्ये सीताफळ भरून घेऊन येत होता. या कॅरेटमध्ये सीताफळ खराब होऊ नये. म्हणून सीताफळाचा पाला टाकला जायचा. परंतु व्यापाऱ्यांनी यावर निर्बंध घातले होते. हे निर्बंध शेतकऱ्याच्या दृष्टीने चुकीचे होते. यात शेतकऱ्याचे आर्थिक व मालाचेही नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणीच्या वतीने सीताफळ बाजारातील व्यापाऱ्यांशी बैठक घेऊन खरेदी विक्री संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
दिवाळीच्या मुहूर्तावर सासवडच्या सीताफळ बाजारातील व्यापाऱ्यांनी संघटनेच्या वतीने काही अटी व नियम जाहीर केले होते. शेतकऱ्यांसाठी हे सर्व त्रासदायक होते. यादरम्यान बाजारपेठेमध्ये सीताफळाची मंदी झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सासवडच्या बाजारात सर्व व्यापारी व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले. त्यामध्ये सर्वमान्य तोडगा निघाला. शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सिताफळे बाजारात आणावीत असे आवाहनही संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आले.
बैठकीसाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी उत्तमराव झेंडे, संतोष मगर, संतोष काकडे, रामदास मेमाणे, बबनराव काळे, पंढरीनाथ कामथे, नाना फराटे, कैलास जाधव, प्रशांत वांढेकर, अनिल खेडेकर उपस्थित होते.
सासवड येथील बाजारात पुणे, सांगली, कराड, वेल्हा, महाड, कोल्हापूर, मिरज, मुंबई या ठिकाणावरून शे-दीडशे व्यापारी दररोज सासवड बाजारात येत असतात. तर सासवड व पुरंदर तालुक्यातून हजारो शेतकरी आपला माल घेऊन या ठिकाणी येतात. साधारण ५०० ते २००० पर्यंत मालाच्या प्रतवारीनुसार बाजार भाव शेतकऱ्यांना दिला जातो.
त्याचबरोबर अनेक शेतकरी व व्यापारी काळुराम मगर, गिरीश काळे, अजित पोमण, बापू शेलार, सागर धुमाळ, गणेश काळे, काळ्हाने तसेच दीपक काळे शेतकरी उपस्थित होते.

06160