कोडीत येथे काकड आरतीची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडीत येथे काकड आरतीची सांगता
कोडीत येथे काकड आरतीची सांगता

कोडीत येथे काकड आरतीची सांगता

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ९ : कोडीत (ता. पुरंदर) येथे कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा काकड आरती सोहळा सुरू होता. या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. पहाटे देवांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा खांदेकरी दिंडीची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा झाली. त्यानंतर संभाजी महाराज बडदे यांचे काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व व्यावसायिक बाळासाहेब बडदे व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रीनाथ म्हस्कोबा खांदेकरी दिंडीचे अध्यक्ष तुकाराम जरांडे, सरपंच रंजना खुटवड, ज्ञानदेव राजवडे, दत्ता बडदे, दयानंद जरांडे, बाळासाहेब बडदे, माजी उपसरपंच निवृत्ती जरांडे आदी उपस्थित होते.