केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा
केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा

केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ११ : ‘‘केंद्रीय नेतृत्व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये उज्ज्वला गॅस, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी पाण्याचा नळ, पंतप्रधान आवास योजनेतील गरीब कुटुंबांना घरे देणे, प्रत्येक घरी विद्युत पुरवठा, गरीब शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजना दिल्या आहेत. या मागचा विचार महत्त्वाचा आहे. या योजनांचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत करा,’’ असे आवाहन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे बारामती लोकसभा प्रवासअंतर्गत शेतकरी व लाभार्थी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, दिलीप खैरे, गिरीश जगताप, सचिन लंबाते, नीलेश जगताप, ऋतुजा जाधव, श्रीकांत ताम्हाणे, श्रीकांत थिटे, अमोल जगताप, विठ्ठल जगताप, धनंजय कामठे, संजय कामठे, विशाल कटके आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबांना अनेक योजना दिल्या आहेत. त्या लक्षात ठेऊन सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांनी करावे.’’
भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी प्रास्ताविक; तर संदीप कटके यांनी सूत्रसंचालन केले. कैलास जगताप यांनी आभार मानले.

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळत असते. यामध्ये ग्रामपंचायतीपासून तालुकाध्यक्ष-जिल्हाध्यक्ष हे कार्यकर्ते पुढे येत असतात. त्यातूनच पक्ष भरारी घेतो. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत.
- प्रल्हादसिंह पटेल, केंद्रीय राज्यमंत्री