वळसे पाटील महाविद्यालयास न्यास पुस्तक पेढीतर्फे पुस्तके भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळसे पाटील महाविद्यालयास
न्यास पुस्तक पेढीतर्फे पुस्तके भेट
वळसे पाटील महाविद्यालयास न्यास पुस्तक पेढीतर्फे पुस्तके भेट

वळसे पाटील महाविद्यालयास न्यास पुस्तक पेढीतर्फे पुस्तके भेट

sakal_logo
By

बेल्हे, ता. १२ : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, (प्रभादेवी, मुंबई) यांच्या पुस्तक पेढीकडून प्रशांत पब्लिकेशनची एकूण १ हजार ७१७ अशी सुमारे एकूण तीन लाख ११ हजार ९५ रुपये किमतीची अभ्यासक्रमातील पुस्तके देण्यात आली आहेत, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी दिली.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व गरजू विद्यार्थ्यांना या पुस्तक पेढीकडून अभ्यास क्रमिक पुस्तके वितरित केली जातात. यासंबंधी महाविद्यालयाने अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घेतले. विद्यार्थ्यांचे अर्ज पुस्तक पेढीत जमा करून पाठपुरावा ग्रंथपाल मंगल उनवणे यांनी केला. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने केलेल्या दातृत्वाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच, या पुस्तक पेढीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पुस्तकांचा संच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर न्यास पुस्तक पेढीच्या या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे आणि सर्व संचालकांनी कौतुक केले.