सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे भिवडी येथे दोन घरांना आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे
भिवडी येथे दोन घरांना आग
सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे भिवडी येथे दोन घरांना आग

सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे भिवडी येथे दोन घरांना आग

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १४ : भिवडी (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरला गळतीमुळे लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
भिवडी-मोकाशी वस्ती येथे मारुती नथू खोमणे व रामदास नथू खोमणे यांचे घर आहे. ते नारायणपूर येथे नातेवाईकांचे लग्न आटपून घरी रात्री साडेनऊ वाजता आले होते. नंतर दहाच्या सुमारास गॅसवर दूध तापवत असताना अचानक गॅसला गळती सुरू झाली. त्यानंतर सिलिंडरने पेट घेतल्याने कुटुंबातील सर्व घराबाहेर आले. काही क्षणात गॅसचा मोठ्या प्रमाणावर भडका झाला व घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच, सिलिंडरच्या टाकीतून निघणारी आग ओल्या चादरीच्या साहाय्याने आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील रोख ५० हजार रुपये, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागदागिने याची राखरांगोळी झाली. येथील दोन कुटुंब बेघर झाली व अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील अक्षय शिंदे, माजी सभापती विठ्ठल मोकाशी, माजी उपसरपंच बापू मोकाशी, बाळासाहेब भिंताडे, दिलीप वांढेकर, सुरेश चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट दिली.