कोडीतला ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडीतला ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा गजर
कोडीतला ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा गजर

कोडीतला ‘सवाई सर्जाचं चांगभलं’चा गजर

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १७ ः श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिरात कालाष्टमी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्तांनी ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात श्रीनाथांचा जन्मोत्सव साजरा केला.
पहाटे श्रीनाथांना महाअभिषेक दुपारी रुद्राभिषेक, रुद्रयाग व होमहवन, सायंकाळी ६ वाजता महाआरती व त्यानंतर उपस्थित श्रीनाथ भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ९ ते ११ वाजता रोहिणी महाराज परांजपे यांचे नारदीय सुश्राव्य कीर्तनाचा श्रीनाथ भक्तांनी लाभ घेतला.
संपूर्ण मंदिर परिसर व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी ही गुरोळी गावचे उद्योजक सोमनाथ खेडेकर आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली. कालाष्टमी कार्यक्रमाचे नियोजन श्रीनाथ देवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
6241