प्रशासनाच्या विरुद्ध सासवडला उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाच्या विरुद्ध 
सासवडला उपोषण
प्रशासनाच्या विरुद्ध सासवडला उपोषण

प्रशासनाच्या विरुद्ध सासवडला उपोषण

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २१ : जेजुरी (ता. पुरंदर) येथील शेतजमिनीबाबत पंकज म्हाळसाकांत पेशवे व इतर पाच जणांविरोधात तक्रार न घेतल्यामुळे आणि जेजुरी पोलिस ठाण्यात आपल्याला सहकार्य मिळत नसल्यामुळे श्रद्धा अनिल कुलकर्णी, पद्मा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कार्यालय येथे उपोषण केले. जेजुरी येथील गट नंबर ८४४मध्ये शेतकऱ्यांनी लावलेली आंबा व चिक्कूची झाडे सचिन म्हाळसाकांत पेशवे, पंकज घोणे, पंकज रहाटेकर, किरण थेऊरकर व इतरांनी उपटून घेऊन गेले व आम्हाला जीवे मारण्याची धमकी व दमदाटी केली. याबाबत आम्ही जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये गेले असता त्यांनी गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केली. तसेच, आम्हाला सहकार्य केले नाही, असे कुलकर्णी व देशमुख यांनी सांगितले. याबाबत नायब तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले असून, जेजुरी पोलिस घटनास्थळी भेट देऊन उद्या यावर निर्णय घेणार आहेत.