सासवड येथे साबळे फार्मसी महाविद्यालयात आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड येथे साबळे फार्मसी महाविद्यालयात आरोग्य तपासणी
सासवड येथे साबळे फार्मसी महाविद्यालयात आरोग्य तपासणी

सासवड येथे साबळे फार्मसी महाविद्यालयात आरोग्य तपासणी

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ४ ः सासवड (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
उद्‌घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, विद्या म्हस्के सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सासवड ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक जि. डी. शिंगटे, स्वाती वाघोले, आशा कुंभारकर, रुद्र गोविंदे आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये एचआयव्ही., रक्तातील साखर, ब्लड प्रेशर व वजन या चाचण्या करण्यात आल्याची अशी माहिती प्राचार्या डॉ. चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शीतल दरेकर व प्रा. अश्विनी कुंजीर, प्रा. सायली चव्हाण, प्रा. समीक्षा भोंगळे यांनी केले.