दत्त जयंती सोहळा सासवड येथे उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्त जयंती सोहळा
सासवड येथे उत्साहात
दत्त जयंती सोहळा सासवड येथे उत्साहात

दत्त जयंती सोहळा सासवड येथे उत्साहात

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ७ ः सासवड (ता. पुरंदर) येथील धान्य बाजारपेठेमधील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे देवांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आरती होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सायंकाळी हभप मंगेश जोशी यांचे दत्त जन्मावर कीर्तन झाले. त्यानंतर ६ वाजून ४५ मिनिटांनी दत्त जन्म साजरा झाला.

फुलांनी सजविलेल्या पाळण्यात नाव ठेवण्याचा कार्यक्रम होऊन सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी सासवड शहरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शेवते, प्रा. केशव काकडे, हेमंत प्रभुणे, विजय बोत्रे, सुनील जगताप, भा. कं. गायकवाड, नितीन पवार, दादा दिघे, किरण हेंद्रे, सोपान झेंडे, रोहित खवले आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक दत्तात्रेय कावडे, अमोल क्षीरसागर, अशोक कावडे, महेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
रात्री भैरवनाथ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. ८ डिसेंबर रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
-----------------------------