सासवड येथे ५ फेब्रुवारीला 
सत्यशोधक समाज परिषद

सासवड येथे ५ फेब्रुवारीला सत्यशोधक समाज परिषद

सासवड शहर, ता. २ ः सासवड येथे ५ फेब्रुवारीला सत्यशोधक समाज परिषद होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष संभाजीराव झेंडे व ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी माहिती दिली.
सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाबद्दल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये ५ फेब्रुवारीला सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये सत्यशोधक समाज परिषदचे महात्मा फुले प्रतिष्ठान व कै. सदाशिव अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आल्याची माहिती झेंडे व पवार यांनी दिली.
यावेळी कै. एकनाथराव जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रा. जितेंद्र देवकर, प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य अरुण सुळगेकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, युवा नेते ऋषिकेश झेंडे, प्रा. केशव काकडे, हनुमंत झेंडे, शिक्षकनेते वसंतराव ताकवले, तानाजी झेंडे, बाळासाहेब झेंडे, मधुकर जगताप, प्रदीप दुर्गाडे, दत्ता रोकडे, प्रा. डॉ. अरुण कोळेकर, जयंत पाणबुडे, प्रशांत बेंगळे, दिलीप थोपटे, प्राध्यापक बालाजी परतवाड आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
सत्यशोधक समाज परिषदेचे उद्‍घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे या आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके, कोल्हापूर विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पवार हे आहेत.
या समारंभात कै. सदाशिवआण्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांना जीवनगौरव व विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी शुभांगीताई गावडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सत्र दोनमध्ये शैक्षणिक परिसंवाद आयोजित केला आहे. शिक्षक व शिक्षण व्यवस्था (काल आज उद्या) ह्या विषयावर रात्र महाविद्यालय कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक परिसंवाद रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com