Wed, May 31, 2023

‘वाघीरे’मध्ये उमाजी नाईक यांना अभिवादन
‘वाघीरे’मध्ये उमाजी नाईक यांना अभिवादन
Published on : 3 February 2023, 4:03 am
सासवड शहरा, ता. ३ : येथील वाघिरे महाविद्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. शिवाजी भुजबळ डॉ. संजय झगडे, डॉ. बी. यु. माने, डॉ. किशोर लिपारे, प्रा. गजेंद्र अहिवळे, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. दत्तात्रेय संकपाळ, डॉ. सुभाष नप्ते, डॉ. प्रा. अनिल झोळ, डॉ. रोहिदास ढाकणे, प्रा. दीपक उजागरे, प्रा. दीपक लोखंडे, प्रा. एच. व्ही. सोनवणे, डॉ. नीता पाटील, विद्या पाटणकर, प्रा. विशाखा गणवीर, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे, रवी जाधव, मीरा चिकणे, संतोष लोणकर आदी उपस्थित होते.