
सासवड येथे पत्रकाराच्या हत्येचा निषेध
सासवड शहर, ता.१२ : येथे (ता. पुरंदर) पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा पुरंदर पत्रकार संघाच्यावतीने नुकताच निषेध करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार यांची झालेली हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावून तालुक्यातील पत्रकारांनी आंदोलन केले.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे व संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रूपाली सरनोबत उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या आणि राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधाचे पत्र दिले.
निवेदन देतेप्रसंगी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे महिला प्रतिनिधी छाया नानगुडे, सदस्य अमृत भांडवलकर, सचिव अमोल बनकर, कोषाध्यक्ष नीलेश भुजबळ, पुरंदर तालुका सोशल मीडियाचे कार्यकारणी हनुमंत वाबळे, अजिम आत्तार, संघटक नीलेश झेंडे पाटील, चंद्रकांत झगडे, बाळासाहेब धुमाळ, डॉ. रामदास लांघी, प्रा.राजेश काकडे आदींसह पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी संघटक उपस्थित होते.