
सासवडला वडार समाजातर्फे सरकारच्या निर्णयाचे स्वागत
सासवड शहर, ता १४ : अखिल वडार समाज महाराष्ट्र यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. यासाठी ५० कोटी रुपये निधी महामंडळासाठी उपलब्ध करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करून सासवड (ता पुरंदर) येथील वडार समाजाने पेढे, फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, भटके विमुक्त आघाडी, प्रदेश कार्याध्यक्ष वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया बाळासाहेब ईटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड येथील शिवतीर्थ चौक येथे पेढे वाटून वडार समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, अप्पा भांडवलकर, आर. पी्. आय तालुक्याध्यक्ष पंकज धिवार, लालाशेठ धोत्रे, राहुल मोहिते, दीपक शिंदे, संतोष ईटकर, प्रणव शिंदे, महादेव ईटकर, अविनाश ईटकर, विकास देशमुख, बंटीसागर देशमुख, सूरज नलावडे, रोहिदास शिंदे, सुधीर शिंदे, प्रथमेश ईटकर, शंकर ईटकर, अनिल शेलार, पंकज मोहिते, नाथा धोत्रे, काळूराम जाधव, प्रणव शिंदे, निर्मला ईटकर, अनिता ईटकर, कावेरी ईटकर, पारूबाई धोत्रे, शकुंतला धोत्रे, उज्वला जाधव, सरस्वती मोहिते, रूपाली शिंदे, कमल पवार, वैशाली जाधव, गणेश धोत्रे, नीलेश विटकर, दिलीप आबा कुंभारकर आदी उपस्थित होते.
...........
06607