शिवतारे यांनी माफी मागावी

शिवतारे यांनी माफी मागावी

गराडे, ता. १६ : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या बेताल वक्तव्याविरुद्ध जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी दिवे व गावाच्या बारा वाड्यांनी बंद पुकारत काळ्या फिती दाखवत निषेध केला.
पवारवाडी ते झेंडेवाडी हा भाग सर्व पालखी महामार्गाला लागून आहे. या मार्गावर ढाबे व मोठ मोठी हॉटेल आहेत. या लोकांबद्दलचे मोठे नुकसान झाले तरी आमचे नेते दादासाहेब जाधवराव व बाबासाहेब जाधवराव यांच्यासाठी नुकसान सोसले आहे, असे माजी सरपंच अमित झेंडे यांनी सांगितले. पवारवाडी, ढुमेवाडी, झेंडेवाडी, काळेवाडी, जाधववाडी, पवारवाडी, आदी बारा वाड्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याची माहिती
दिव्याचे सरपंच गुलाब झेंडे यांनी दिली.
यावेळी झेंडेवाडीच्या सरपंच पूनम झेंडे, माजी सरपंच अमित झेंडे, उपसरपंच भारती आढागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता काळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश काळे, सुजाता जगदाळे, शोभा लडकत, शिवाजी खटाटे, शरद झेंडे, अमर झेंडे, रुपेश राऊत, अविनाश झेंडे, योगेश बाळा काळे, संतोष झेंडे, शांताराम खटाटे, विजय काळे, रघुनाथ काळे, नवनाथ भापकर, संदीप जगदाळे, संजय काळे, निखिल झेंडे, रमाकांत काळे, गणेश काळे आदी उपस्थित होते.

PNE23T31006

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com