पुरंदरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक

पुरंदरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक

सासवड शहर ता. २९ ः पुरंदर तालुका भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वांनी सज्ज राहावे, यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करायची सूचना यावेळी तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी दिल्या.
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले, मार्केट कमिटीच्या निवडणुका भाजप, सेना युतीत लढवायच्या का स्वतंत्र लढवायच्या यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. सध्या निवडणुकीची कागदपत्रे व इतर बाबींविषयी ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी तयारीला लागावे असे सांगितले.
यावेळी दयानंद फडतरे, नीलेश जगताप, साकेत जगताप, अमोल जगताप, संजय निगडे, श्रीकांत थिटे, सूरज औचरे, जालिंदरदादा जगताप, संदीप कटके, सचिन पेशवे, सचिन लंबाते, आनंद दत्तात्रेय जगताप आदी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com