चांबळीत श्रीराम मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचे सामुदायिक वाचन

चांबळीत श्रीराम मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचे सामुदायिक वाचन

सासवड शहर, ता. ३० : चांबळी (ता. पुरंदर) येथील श्रीराम मंदिरात माऊली महाराज जोगदंड यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे व काल्याचे कीर्तन रंगले. ज्ञानेश्वरीचे सामुदायिक वाचन, पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. रामजन्माच्या वेळी उपस्थित भाविकांनी फुलांचा वर्षाव केला.
यावेळी भाजपचे तालुका अध्गंयक्ष गंगाराम जगदाळे, म्हस्कू महाराज कामठे, मारुती कामठे, वामन भाऊ कामठे, शहाजी कामठे, रघुनाथ कामठे, सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, भाऊसाहेब कामठे, प्रकाश भालेराव, प्रसाद कामठे, रघुनाथ कामठे, नाना शेंडकर, परशुराम कामठे, विलास कामठे, नारायण कामटे, बाळासाहेब कामठे, शिवसेनेच्या बारामती विभागाच्या प्रमुख गीतांजली ढोणे आदी उपस्थित होते.
कै. भिकोबा विठोबा कामठे व कै. रामचंद्र देवबा कामठे यांच्या प्रेरणेने राम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येते. श्री रामेश्वर तरुण मंडळ चांबळी यांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान, पुजारी दादा गुरव यांनी मंदिराची सजावट केली होती. मोहन महाराज नाईकवडे यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यांत आला.


चांबळी (ता. पुरंदर) : माऊली महाराज जोगदंड यांचे कीर्तन ऐकण्यासाठी झालेली राममंदिरात गर्दी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com