विविध व्यवसायांतून विकास सोसायटी सक्षम करा

विविध व्यवसायांतून विकास सोसायटी सक्षम करा

गराडे, ता. ३० : ''''सोसायटीने केवळ कर्ज वाटप हा एकच व्यवसाय करायला नको. खते, बि-बियाणे, शेतीची अवजारे अशा विविध व्यवसायांद्वारे सोसायटीला अधिकचा नफा मिळवून देता येईल. यातून विकास सोसायटी आणखी सक्षम करावी,'''' असे आवाहन आवाहन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.

आपण सगळ्यांनी या ठिकाणी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच एकर जागा आरक्षित केली आहे. पुरंदरला आपल्याकडे बाजार समितीच्या माध्यमातून नीरा आणि सासवड या दोनच ठिकाणी बाजार समित्या आहेत. उपबाजार हे वीर दिवे वाघापूर या परिसरामध्ये व्हावी, अशी सगळ्या पुरंदरकरांची या ठिकाणी मागणी होते. मला खात्री आहे की आपण सगळे जण एका विचाराने पुन्हा एकदा नवीन संचालक मंडळी व नवीन होणारे सभापती उपसभापती येतील. त्यांच्या मदतीने दिवे नीरा कृषी बाजारसमितीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु करू, असा विश्‍वास यावेळी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पीडीसीसी बँकेची शाखा दिव्यात सुरू करावी, अशी मागणी संभाजीराव झेंडे यांनी या वेळी केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, मोहन पाटील, बापूसाहेब भापकर, दिलीप झेंडे, तानाजी झेंडे, अरुण यादव, रमेश झेंडे, पोपट झेंडे, नीलेश झेंडे, प्रकाश पवार, बाळासाहेब भापकर, गणपत शितकल, राजेंद्र काळे, गणेश मोरे, पांडुरंग कोकरे आदी उपस्थित होते. मुरलीधर झेंडे यांनी प्रास्ताविक तर सागर काळे यांनी आभार मानले.
06840

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com