Wed, Sept 27, 2023

भानूकाका जगताप यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
भानूकाका जगताप यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
Published on : 20 May 2023, 7:19 am
सासवड शहर, ता. २० : वसंत दादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शिवाजी पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार नीरा मार्केट कमिटीचे माजी संचालक भानूकाका जगताप यांना जाहीर झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी (ता. २२) मे रोजी सकाळी नऊ वाजता गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे