
कातोबा हायस्कूलमध्ये रंगला स्नेहमेळावा कातोबा हायस्कूलमध्ये रंगला स्नेहमेळावा
गराडे, ता. २८ : दिवे (ता. पुरंदर) येथील श्री कातोबा हायस्कूल येथील प्रशाळेतील १९९७-९८ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार झाला. मेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी शाळेसाठी ५१ हजार रुपयांचा निधी उभारण्यात आला.
दरम्यान, शाळेचे माजी विद्यार्थी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अडसूळ सर, आर. के. कुंभारसर, चौधरी मॅडम, पी. आर. कुंभार सर, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव बोराटे उपस्थित होते. प्रमोद टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक तर समीर टिळेकर यांनी आभार मानले.
सागर काळे, योगेश काळे, योगेश गायकवाड, प्रतिभा झेंडे व जयश्री पवार, संदीप काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
06974