वारीसाठी आरोग्य सुविधेसाठी पथके सज्ज : काळे

वारीसाठी आरोग्य सुविधेसाठी पथके सज्ज : काळे

सासवड शहर, ता ३ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात येत्या १४ व १८ रोजीच्या कालावधी येणार आहे. यामुळे झेंडेवाडी ते नीरापर्यंत येणाऱ्या गावांमध्ये पंचायत समिती पुरंदर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधा देण्यासाठी सेवा पथके सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी, पुरंदर डॉ. विक्रम काळे यांनी दिले.
पालखी मार्गावर उपकेंद्र ४ आहेत यात दिवे, शिवरी, साकुर्डे, दौंडज तसेच पालखी मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र ३ असणार आहेत यात बेलसर, वाल्हा, नीरा या काळात तालुका आरोग्य अधिकारी १, वैद्यकीय अधिकारी ८, समुदाय आरोग्य अधिकारी ३० यात आरोग्य सहायक (पुरुष) ७ व आरोग्य सहायक (महिला) ७ तसेच आरोग्य सेवक २७ व आरोग्य सेविका २५ आणि मिश्रक ३, शिपाई ९ यांचा सामावेश आहे असे डॉ विक्रम काळे यांनी सांगितले.
या पालखी सोहळ्यासाठी आरोग्य सेवा उपचार पथकाने झेंडेवाडी स्टॅंड, दिवे स्टॅंड, शिवरी स्टॅंड, बेलसर फाटा, दौंडज स्टॅंड, प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा, पालखीतळ नीरा असे असणार आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी औषध उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालय सासवड, ग्रामीण रुग्णालय जेजुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा याठिकाणी उपलब्ध असतील, असे काळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com