सासवडकडे जाणारी वाहतूक बंद राहील

सासवडकडे जाणारी वाहतूक बंद राहील

सासवड शहर, ता. ८ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर येथून १४ जून रोजी प्रस्थान ठेऊन वडकी मार्गे दिवेघाटमार्गे सासवडकडे मुक्कामी जाणार आहे. तेव्हा वडकी मार्गे दिवेघाटाच्यापुढे सासवडकडे जाणारी वहातूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर वहातूक खडीमशीन चौक कात्रज कापूरव्होळ मार्गे जाईल. सासवडकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खेडशिवापूर मार्गेपुढे जाईल. पुणे येथून सासवड, जेजुरी, वाल्हे मार्गे नीरा अशी जाईल. नीरा येथून पुण्याकडे जाणारी झेंडेवाडी, पारगाव मेमाणे, सुपे, मोरगाव, नीरा यामार्गाने जाईल.
पुणे येथून सासवडकडे जाण्यासाठी जेजुरी, वाल्हे, नीरा तसेच येथून पुण्याकडे जाणाऱ्या जडवहानांनी सासवड, जेजुरी, मोरगाव असा पर्यायी मार्गांचा वापर करावा असे घोलप यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com