तुकाई माता मंदिरात ‘ब्रह्माकुमारी’ची रंगली दिवाळी पहाट
सासवड शहर, ता. २४ : सासवडकर रसिकांसाठी भाऊबीजेचे निमित्त साधून शहरातील लांडगे आळीतील तुकाई माता मंदिरात स्वर साधक प्रस्तुत भूपाळी ते भैरवी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सासवड येथील
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने याचे आयोजन केले होते. पुरंदरमधील स्थानिक कलाकार व मंडळींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. सुवर्णा होले, मच्छिंद्र दीक्षित, गुलाब बुध्ये, संजय काटकर, स्वरा व ज्ञानेश्वरी दीक्षित या गायक कलाकारांनी विविध रचना सादर केल्या. ‘प्रथम तुला वंदितो’ने सुरू झालेल्या या संगीत प्रवासात निघालो घेऊन दत्ताची पालखी, पायोजी मैने राम रतन, एक राधा एक मीरा अशा विविध स्वरूपातील गीतांचे सुंदर सादरीकरण झाले. पांडुरंग श्रीरंग भज रे मना या भैरवीने व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रख्यात तबला वादक राजेंद्र दुरकर यांच्यासह समद पठाण, चंदुलाल तांबोळी, स्वप्नील जगताप, मच्छिंद्र दीक्षित या वाद्यवृंदानी सुंदर संगीत साथ दिली. बाळासाहेब फडतरे (गुरुजी) यांनी सूत्रसंचालन केले.
‘‘सासवड शहरात हनुमान भजनी मंडळ, सासवड पत्रकार संघ, पुरंदर मेडिकल, ग्रामीण संस्था यांच्या माध्यमातून दिवाळी पहाटचा उपक्रम सादर करून सासवडकरांना दिवाळीत संगीताचा आनंद मिळवून देतात हीच परंपरा आता गावच्या गावठाणात तुकाई माता मंदिरात माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे यांच्या माध्यमातून सुरू केली आहे. अशा उपक्रमामुळे सासवडची ओळख आता सांस्कृतिक राजधानी म्हणून होईल,’’ असे माजी आमदार संजय जगताप यावेळी म्हणाले.
मध्यंतरात औदुंबर महाडीक यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या नीलिमा दीदी यांनी मान्यवरांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले. शेखर वढणे, सुहास लांडगे, संजय चवरे, ॲड. भगवान होले, डॉ. राजेश दळवी, मोहन बागडे, अनिल कदम, आनंद जगताप, इंदिरा पवार, कल्याणी चिंबळकर, हरिभाऊ शेवते संगीता लांडगे, सखाराम लांडगे, ॲड. सुदाम सावंत, ॲड. नितीन जाधव, डॉ. संदीप होले, मोहन जगताप, माऊली गिरमे, हेमंत ताकवले, तानाजी सातव आदींनी याप्रसंगी हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

