इंदापुरात सामूहिक नमाज अदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात सामूहिक नमाज अदा
इंदापुरात सामूहिक नमाज अदा

इंदापुरात सामूहिक नमाज अदा

sakal_logo
By

इंदापूर, ता. ३ ः इंदापूर शहरात हजारो मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर पारंपरिक पद्धतीने दर्गाह मशीद मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिकपणे ईद उल फित्रची नमाज अदा केली. तत्पूर्वी मौलाना मुशाहिदी यांच्या हस्ते शिवाजी चौक खडकपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ईदनिमित्त अलमगीर, मदिना, आयेशा, कुरेशी मशिदीत नमाज पठण झाले. राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ईदगाह व मदिना मशीद प्रांगणात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक भरत शहा, नगरपरिषद गटनेते कैलास कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, वसंत मालुंजकर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अबुलखान पठाण, फारुक काझी, जकिर काझी, हाजी नवाज बागवान, जब्बार मोमीन, अरिफखान जमादार, चमन बागवान, युसूफ शेख, शर्फुद्दिन मोमीन, गालिब बागवान, नगरसेवक अमर गाडे, दिलीप वाघमारे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादा पिसे, अल्ताफ पठाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा
‘‘काही लोक समाजात धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यापासून सावध राहा. आजपर्यंत आपण आपले सण एकत्रित साजरे करून राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. तेच पुढे चालू ठेवा. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिली.’’


इंदापूर ः ईदनिमित्त शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविताना मुस्लिम बांधव.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02905 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top