अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी
अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी

अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

इंदापूर, ता. ७ ः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील अनधिकृत ६७४ शाळांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे. कॉप्स संघटनेच्या मागणीवरून राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांची माहिती शिक्षण संचालकांनी पाठवली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी व पालकांना या अनधिकृत शाळांची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भाने तत्काळ कायदेशीर कारवाई करून अनधिकृत शाळांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर तसेच नामांकित वृत्तपत्रात तत्काळ प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. या प्रकरणी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असल्याचे कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड व युवक अध्यक्ष अलोक कनोजिया यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02911 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top