ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ः जामदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ः जामदार
ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ः जामदार

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ः जामदार

sakal_logo
By

इंदापूर, ता. ७ ः ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केली.
शरद जामदार पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, अशी भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे. येणाऱ्या काळात दोन तृतीयांश निवडणुका होणार असून या निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही. आरक्षण नसेल तर ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यामुळे त्यांची मुख्य विकास प्रवाहात येण्याची संधी हुकणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना न्यायालयात हे आरक्षण टिकविता आले नाही. महाविकास आघाडी सरकारने इम्पिरिकल डेटासाठी योग्य पावले न उचलता त्यांची त्यांनी दिशाभूल केली, अशी टीका जामदार यांनी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02913 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top