
इंदापूर शहराला १५ कोटी देणार
इंदापूर, ता. ७ : इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली.
इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी राजे सभागृहात मंत्री भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना भरणे बोलत होते. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरपरिषद अभियंता रविराज राऊत, वर्षा क्षीरसागर,गजानन पुंडे, विलास चव्हाण, सतीश तारगावकर, प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, अशोक चिंचकर, अल्ताप पठाण यांनी आढावा सादर केला. गारटकर म्हणाले, ‘‘इंदापूर शहरास तरंगवाडी तलावातून पिण्याचे पाणी दिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील.’’
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, धनंजय बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, वसंत मालुंजकर, वसीम बागवान यांनी शहर विकासासाठी लक्ष वेधले. यावेळी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, स्वप्नील राऊत, अतुल शेटे पाटील, श्रीधर बाब्रस, इम्रान शेख, महादेव लोखंडे, प्रा. अशोक मखरे, दिलीप वाघमारे, हरिदास हराळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष उमा इंगुले, स्मिता पवार आदी उपस्थित होते.
इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरातील अंतर्गत रस्ते, भुयारी गटारे, चौक सुशोभीकरण, धार्मिकस्थळांमध्ये सुविधांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील व्यंकटेश नगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी दिला जाईल. शहरातील रिंग रोडचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिला आहे.
- दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री
Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02918 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..