इंदापूरसाठी साडेआठ कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरसाठी साडेआठ कोटींचा निधी
इंदापूरसाठी साडेआठ कोटींचा निधी

इंदापूरसाठी साडेआठ कोटींचा निधी

sakal_logo
By

इंदापूर, ता. ११ : इंदापूर तालुक्यासाठी नागरी सुविधा योजनेमधून १ कोटी ५७ लाख, लेखाशीर्ष ३०५४ गट ब व कमधून दोन रस्त्यांकरिता २ कोटी; तर २५१५ योजनेतून ५ कोटी, असा एकूण ८ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर कामे : सणसर समर्थ नगर थोरात घर रस्ता- ६ लाख, अंथुर्णे शिंदे मळा अंतर्गत रस्ता- १५ लाख, अंथुर्णे ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता- २० लाख, काटी प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता- १० लाख, लासुर्णे ग्रामपंचायत ते माळी मळा रस्ता- १० लाख, बिजवडी काळेल वस्ती अंतर्गत रस्ता- १० लाख, बेलवाडी कुंभार वस्ती रस्ता- १० लाख, लासुर्णे बंदिस्त गटार- १० लाख, सणसर शब्बीर काझी घराकडे जाणारा रस्ता- १० लाख, अंथुर्णे अण्णा भाऊ साठेनगर रस्ता- ५ लाख, बावडा जाकीर शेख वस्ती रस्ता- ५ लाख, निमसाखर पिरवाडी अंतर्गत रस्ता- १० लाख, सणसर समर्थ नगर रस्ता- ८ लाख, साई नगर अंतर्गत रस्ता- ८ लाख, भाग्यनगर अंतर्गत बंदिस्त गटार- ५ लाख व अंतर्गत रस्ता १५ लाख.
लेखाशीर्ष ३०५४ गट ब व क- राज्य मार्ग १२१ सणसर ते रायतेमळा खटकेवस्ती रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख व डिकसळ ते योगेश्वरी लिफ्ट दशक्रिया विधी घाट रस्त्यासाठी ६० लाख रुपये.
२५१५ योजना: पोंधवडी, जाधववाडी, डाळज नं २, रणगाव, हगारेवाडी, पिंपरी बुद्रुक, शिंदेवाडी, लाकडी, तक्रारवाडी, झगडेवाडी, गोखळी- प्रत्येकी १० लाख. बेलवाडी, मदनवाडी, पंधारवाडी, करेवाडी- प्रत्येकी ३० लाख. निरवांगी, निमसाखर- प्रत्येकी २५ लाख. बावडा, पळसदेव, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, अगोती नं.१, कालठण नं.१, भिगवण- प्रत्येकी २० लाख. जाचक वस्ती- ८ लाख रुपये, शिरसटवाडी ५ लाख, कुरवली- १६ लाख, भावडी- १६ लाख, वरकुटे बुद्रुक- ३५ लाख.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02927 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top