आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ इंदापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ इंदापुरात
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ इंदापुरात

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ इंदापुरात

sakal_logo
By

इंदापूर, ता. १३ : श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, शहा हेल्थ क्लब तसेच नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ इंदापूर शहा सांस्कृतिक भवन मध्ये योग, प्राणायामची प्रात्यक्षिके सादर करून करण्यात आला. नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र व गोवा राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर, नगराध्यक्षा अंकिता शहा, ट्रस्टविश्वस्त मुकुंद शहा व भरत शहा, वैशाली शहा यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली.
कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा लिखित पुस्तकातील ओळींचा संदर्भ देऊन युवा पिढीने त्यातून आदर्श घ्यावा असे आवाहन मनुरे यांनी केले. ते म्हणाले, स्पर्धेच्या युगात मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग व प्राणायाम ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी असून योग, प्राणायाम, शेती, सहकार, आरोग्य, देशी गोपालन व संवर्धन तसेच शिक्षण यामध्ये ट्रस्ट मार्फत शहा कुटुंबाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ट्रस्टचे युवा विश्वस्त अंगद शहा यांनी परदेशातील नोकरी सोडून ते विविध उपक्रम राबवत आहेत.
यावेळी इंदापूर पतंजली योग समितीचे मदन चव्हाण, दत्तात्रेय अनपट, शहाजी बोराटे, संजय मोरे, शरद झोळ, अंकुश ढुके, माया विंचू, नेहरू केंद्र समन्वयक तानाजी मारकड, माजी समन्वयक डॉ. संदेश शहा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02930 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top