रत्नाकर मखरे यांचे कार्य प्रेरणादायी : दत्तात्रेय भरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नाकर मखरे यांचे कार्य प्रेरणादायी : दत्तात्रेय भरणे
रत्नाकर मखरे यांचे कार्य प्रेरणादायी : दत्तात्रेय भरणे

रत्नाकर मखरे यांचे कार्य प्रेरणादायी : दत्तात्रेय भरणे

sakal_logo
By

इंदापूर, ता. १४ : दिवंगत नगराध्यक्ष रत्नाकर मखरे हे अन्याया विरुद्ध आवाज उठविणारे पँथर होते. त्यांच्यामुळे हजारो मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होता आले. त्यांचे जीवनकार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, भीमाई आश्रमशाळेच्या वतीने दिवंगत नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अस्थिपूजन शकुंतला मखरे, ॲड. राहुल मखरे, ॲड. समीर मखरे, संतोष मखरे यांच्या हस्ते झाले. बुध्द पूजा व प्रतिमा पूजन भंते बुद्धसार तर त्रिशरण व पंचशील बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, रत्नाकर मखरे हे अन्याय करणाऱ्या
प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठविणारे परखड नेते होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन घडले.
यावेळी कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, नगरसेवक कैलास कदम, अमर गाडे, पोपट शिंदे, जगदीश मोहिते, प्रा. कृष्णा ताटे, गोपीचंद गलांडे, डॉ. अमोल उन्हाळे, दिलीप कासार, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्य सविता गोफणे, गोरख तिकोटे, हमीद आतार, माऊली नाचण, हनुमंत कांबळे, नानासाहेब सानप, नानासाहेब चव्हाण, भगवान चंदनशिवे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02933 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top