अहिल्याची एशियन चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्याची एशियन चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी निवड
अहिल्याची एशियन चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी निवड

अहिल्याची एशियन चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

इंदापूर, ता. १७ : शिरसोडी (ता. इंदापूर) येथील युवा कुस्तीपटू अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पयनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा १४ ते १६ जुलै दरम्यान उझबेकिस्तान येथे होणार आहे. इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये ती दहावीमध्ये शिकत आहे. निवडीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अहिल्याची १६ मे रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथील साई स्टेडियममध्ये झालेल्या निवड चाचणीत ४९ किलो वजन गटात निवड झाली. या स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केले होते. त्यांच्याच हस्ते तिला निवडीचे पत्र देण्यात आले.
अहिल्याने यापूर्वी १५ डिसेंबर २०२१ रोजी रांची (झारखंड) येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५० किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच १७ एप्रिल २०२२ रोजी रांची (झारखंड) येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनिअर महिला कुस्तीस्पर्धेत ४९ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून आहे. ती हिस्सार - उमरा (हरियाणा) येथील गुरू हवासिंग आखाडा येथे प्रशिक्षक संजय मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला चुलते पहिलवान ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन व साथ मिळत आहे.
दरम्यान, निवडीबद्दल तिचे राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी अभिनंदन केले.

04830

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02946 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top