सरडेवाडीची प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरडेवाडीची प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल
सरडेवाडीची प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल

सरडेवाडीची प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल

sakal_logo
By

इंदापूर, ता. २० ः सरडेवाडी ग्रामपंचायतीने सरडेवाडी टोल प्रशासनाला स्वच्छतेबाबत नोटीस दिली असून टोलनाका परिसर व रस्ता दुभाजकातील स्वच्छता करण्याची जबाबदारी टोलप्रशासनाची आहे. त्यांच्याकडून योग्य कार्यवाही न झाल्यास पुढील काळात वेळ पडल्यास स्वच्छ सरडेवाडीसाठी टोलला टाळाठोक आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सीताराम जानकर यांनी दिला.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरडेवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छ, सुंदर, हरित व प्लास्टिक मुक्तीचा नारा दिला आहे. त्याअंतर्गत
ग्रामपंचायत हद्दीत महामार्ग, रस्ता दुभाजक व टोलनाका परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी गोळा करण्यात आलेल्या कचऱ्या‍ची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी टोल प्रशासनाला ग्रामपंचायतीकडून स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्तीसाठी नोटीस बजावण्यात आली. यावेळी सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका स्वाती लोंढे चव्हाण म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायतीच्या वतीने टोल प्रशासन, हॉटेल व्यावसायिक, फळविक्रेते यांना कचरा व्यवस्थापनासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. टोल प्रशासन, हॉटेल व्यावसायिक आणि फळविक्रेते यांची संयुक्त बैठक घेऊन कचरा व्यवस्थापन नियोजन करण्यास प्राधान्य देत आहोत. सध्या सरडेवाडीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.’’
या प्रसंगी उपसरपंच सतीश चित्राव, सदस्य रवींद्र सरडे, गोकूळ कोकरे, हनुमंत जमदाडे, प्रियांका शिद, वैशाली शिद, सुप्रिया कोळेकर, वैशाली कोळेकर, गयाबाई तोबरे, अलका कडाळे, दक्षता ढावरे, अलका ढावरे, प्रियांका शिंदे, अतुल ढावरे, स्वच्छ अभियान व्यवस्थापक रेवणसिद्ध सोलापुरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02948 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..