अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार
अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार

अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार

sakal_logo
By

इंदापूर, ता.२१ ः कोणतीही अनधिकृत शाळा सुरु असल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनास १ लाख रुपये इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन १० हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात यावा, असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढला
राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यासाठी सदर शाळांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अनधिकृत शाळांची यादी शासन संकेतस्थळ व नामांकित वृत्तपत्रात तत्काळ प्रसिद्ध करावी आदी मागण्या कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली होती. यावेळी मांढरे यांनी प्राथमिक व माध्यमिक संचालकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संचालक दिनकर टेमकर यांनी कारवाईसाठी निर्देश दिले आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02950 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..