
इंदापुरात अवैध वाळूउपशावर कारवाई
इंदापूर, ता. ७ : इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत इंदापूर पोलिसांनी ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मनोज गायकवाड यांनी फिर्याद दिली होती. मूळ झारखंड येथील मात्र सध्या वांगी (ता. करमाळा) येथे राहणाऱ्या रफिकुल सैफुद्दीन शेख, नवाब सरीफ इसुफ शेख, तारिकल इस्लाम हराजुल शेख यांना या प्रकरणी अटक केली आहे. या वेळी कारवाईत एक फायबर बोट, एक सक्शन बोट तसेच ३२ हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू हे गौण खनिज जप्त करण्यात आले.
मालक कारवाईपासून दूर
पोलिसांनी अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करून बोटीवरील कामगारांना अटक केली. मात्र या बोटीचे मालक मात्र कारवाईपासून दूर आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अवैध वाळू उपसा बंद होणार नाही अशी परिसरात चर्चा आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02977 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..