
इंदापुरातील बागेची दुरवस्था
इंदापूर, ता. १६ : इंदापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शहरातील एकमेव भार्गवराम बगीच्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अबालवृद्ध नागरिकांची कुचंबणा होत असून, बागेमध्ये तातडीने सुविधा उपलब्ध कराव्यात व दोन वर्षापूर्वी पावसामुळे खचलेल्या बागेच्या भरावाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
बागेस संरक्षण नसल्याने पाण्याचे कारंजे, हायमास्ट दिवे चोरीस गेले आहेत. बागेत बसण्याची सिमेंट बाकडी देखील मोडली आहेत. खेळण्यांची देखील तीच अवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी बागेच्या भरावाची भिंत मोडून पडली. मात्र, अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. या भरावाशेजारून अकलूज लिंक रोड जातो, तर दुसऱ्या बाजूस वाकलेले लिंबाचे झाड आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणारे झाड काढणे व भरावाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. बागेत खाऊगल्लीसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
या बागेच्या मातीच्या भरावावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची लाखो रुपये खर्च करून छत्री उभारण्यात आली आहे. मात्र, हा भाग लोकवस्ती विरहित असल्याने छत्रीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. या सर्व बाबींचा विचार करून बगीचा व परिसर विकसित करणे गरजेचे आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02988 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..