शहा येथे ३०० जणांची तपासणी
इंदापूर, ता. १२ : शहा (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, हिंगणगाव यांच्या माध्यमातून ॲनिमिया मुक्त भारत तसेच सर्व रोग निदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात ३०० जणांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये रूग्णांची नेत्र तपासणी, रक्त तपासणी, कर्करोग तपासणी, सामान्य तपासणी तसेच आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. या शिबिरास गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. समीर मुलाणी, शरद शिर्के, डॉ. सुवर्णा शिंदे यांनी रूग्णांची तपासणी केली. सरपंच दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले. यावेळी माजी सरपंच विष्णू पाटील, लहू निकम, भाऊसाहेब खबाले, लालचंद चोपडे, नितीन इजगुडे, महादेव लांडगे, शंकर निकम, राहुल निकम आदी उपस्थित होते.

