दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही डोळ्यासमोर
दादांच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही डोळ्यासमोर
- प्रदीप गारटकर, भाजप नेते, इंदापूर
अजितदादांच्या बरोबर गेली २० वर्षे अगदी जवळून संपर्क आला. आम्ही विरोधी पक्षात असतानाही त्यांच्याबरोबर संबंध यायचा, मात्र त्यांनी कधी त्रास दिला, असे कधीही झाले नाही. ज्या वेळेला मी राष्ट्रवादीत येण्याची भूमिका पवारसाहेबांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये मांडली, त्यावेळी पवारसाहेबांनी माझ्यासमोरून अजितदादांना फोन करून, ‘प्रदीपला पाठवतोय तुझी भेट घ्यायला, तो आपल्या पक्षात येतोय...’ यावर दादांचा प्रतिसाद आला, ‘प्रदीप, प्रदीप गारटकर, इंदापूरचा प्रदीप येतोय आपल्याकडे?’ त्यांना आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर जेव्हा आमची भेट झाली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता, तो आनंद मला आजही आठवतोय. पुढच्या काळामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. त्यावेळी सोलापूरमध्ये एकत्र विमानाने जाण्याचा योग आला, तेव्हा आमचे विमान सोलापूर शहरालगत असलेली धुराडीच्या अगदी जवळून गेले, त्यावेळी अजित पवार आणि माझ्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. यावेळी दादा पायलटला खूप ओरडले. तसेच, यावर सोलापूरमध्ये पोहोचल्यावरही कार्यकर्त्यांना यावर फैलावर घेतले. ‘तुम्ही आमचा जीव धोक्यात घालता का?’ असा सवाल केला. असे अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

