सासवडला १५ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडला १५ मे रोजी 
सामुदायिक विवाह सोहळा
सासवडला १५ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा

सासवडला १५ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा

sakal_logo
By

जेजुरी, ता. ३० ः आदर्श क्रांती संघटनेच्यावतीने १५ मे २०२२ रोजी सासवड येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. पुरंदर हायस्कूल येथे हा सोहळा होणार आहे.
मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व खर्च वाचवावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक संजय ज्ञानोबा जगताप यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व सर्वांची भोजनाची व्यवस्था संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. विवाह नोंदणी सासवड व जेजुरी येथे चालू आहे.
शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित वधुवरांना दहा दहा हजार रुपये दिले जातील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, विकासअप्पा जगताप, सचिव राहुल इनामके यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00612 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top