रामदास गरुड यांना गोपालक पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास गरुड यांना गोपालक पुरस्कार प्रदान
रामदास गरुड यांना गोपालक पुरस्कार प्रदान

रामदास गरुड यांना गोपालक पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

जेजुरी, ता. ७ ः बेलसर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी रामदास गरुड यांना बाल सिद्धनाथ प्रतिष्ठान व बेलसर ग्रामस्थांच्या वतीने आदर्श गोपालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बाल सिद्धनाथ प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. गरुड हे प्रगतशील शेतकरी असून त्यांच्या कुटुंबीयांचे बैलजोडीवर खूप प्रेम आहे. गेल्या २० वर्षांपासून ते दुग्धव्यवसाय करीत आहेत. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरुंगे, पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे, पुरंदर भाजपचे सरचिटणीस कैलास जगताप आदी उपस्थित होते.
JEJ22B01346

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00618 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top