बेलसरला आज शिवमिती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलसरला आज शिवमिती सोहळा
बेलसरला आज शिवमिती सोहळा

बेलसरला आज शिवमिती सोहळा

sakal_logo
By

जेजुरी, ता. २८ ः स्वराज्याची पहिली लढाई बेलसर-खळद परिसरात झाली. त्यानिमित्ताने बेलसर (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. २९) शिवमिती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या लढाईतील आत्मविश्वासामुळे स्वराज्याला बळ मिळाले. त्यामुळे इतिहासात या लढाईला महत्व आहे. त्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन, घुमटेश्वर अभिषेक आदी कार्यक्रम होणार आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक उमेश तावस्कर, साहित्य परिषदेचे सदस्य रावसाहेब पवार उपस्थित राहणार आहेत. महिला शाहिर विनिता जोशी यांचा कार्यक्रम, दांडपट्टा व तलवार बाजीचे प्रात्यक्षिक आदी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00623 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top