
जेजुरीत भंडारा उधळत पुतळ्यास अभिवादन
जेजुरी, ता. २ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने पायरीमार्गावर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विधिवत अभिषेक करून भंडारा उधळत अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त अशोकराव संकपाळ, पंकज निकुडे, शिवराज झगडे, संदीप जगताप, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, पर्यवेक्षक गणेश डीखळे, उत्सव सोहळा समितीचे संतोष खोमणे, ॲड. गणेश लेंडे व भाविक उपस्थित होते.
जेजुरीत गडकोटाच्या पायरीमार्गावर अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राज्यातील विविध संघटना व अनुयायी यांनी केली होती. त्यानुसार गतवर्षी देवसंस्थानच्या वतीने १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारला आहे. जयंतीदिनाच्या निमित्ताने विविध भागातील संघटना, पदाधिकारी व अनुयायी येथे दाखल होऊन देवदर्शन करीत अभिवादन करत होते. तसेच, उत्सव सोहळा समितीच्या वतीने संतोष खोमणे यांनी शहरामध्ये जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जेजुरी येथे येऊन देवदर्शन करीत पुतळ्याला अभिवादन केले. तसेच, अहिल्यादेवींनी मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीतीरावर निर्माण केलेल्या महेश्वर या राजधानीतून होळकर घराण्याचे १६वे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी नर्मदाजल व हातमागावर तयार केलेली ‘महेश्वर शाल’ पूजेसाठी पाठवली होती.
६७९९०
Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00627 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..