
अभिमन्युचे नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत यश
जेजुरी, ता. ४ : कोळविहिरे (ता.पुरंदर) येथील अभिमन्यू दशरथ घोरपडे यांनी यांची नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीतील शिक्षण पूर्ण झाल्याने नुकतीच आउट परेड
संपन्न झाली. अभिमन्यू लिमा स्कोड्रॅणचे नेतृत्व करीत होता. १६ स्कोड्रनमध्ये त्याला बेस्ट स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टनची मानाची ट्रॉफी मिळाली.
अभिमन्यूचे वडील दशरथ घोरपडे हे माजी सरपंच व जेजुरी देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त आहेत तर आई सविता या गृहिणी आहेत. त्याचे पुढील प्रशिक्षण भारतीय नौसेना अॅकॅडमी ईझींमोला केरळ येथे होणार आहे. तद्नंतर त्याची सब लेफ्टनंटपदी नियुक्ती होईल.
शेतकरी कुटुंबातील अभिमन्यूचे ७वी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये झाले होते. नियोजबद्ध अभ्यास, कष्ट व चिकाटी यांच्या जोरावर त्याने राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे ८ ते १२ निवडीनंतर शिक्षण पूर्ण केले. २०१९ मध्ये त्याची निवड एनडीए, पुणे येथे भारतीय नौसेना कॅडेट म्हणून झाली होती. तेथील तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण होऊन बाहेर पडला. त्याचा डिफेन्स अॅकॅडमीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
पुणे : अभिमन्यू दशरथ घोरपडे याला सन्मानित केल्यानंतर उपस्थित असलेले त्याचे आई-वडील.
Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00630 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..