जेजुरीत दहा प्रभागात वीस सदस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीत दहा प्रभागात वीस सदस्य
जेजुरीत दहा प्रभागात वीस सदस्य

जेजुरीत दहा प्रभागात वीस सदस्य

sakal_logo
By

जेजुरी, ता. १३ : जेजुरी (ता. पुरंदर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दहा प्रभागातून वीस सदस्य निवडले जाणार आहेत.
पालिकेत प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोले,मुख्याधिकारी चारूदत्त इंगुले यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब खोमणे, बाळासाहेब बगाडे, राजेंद्र गाढवे यांनी सोडतीचे नियोजन केले.
एकूण दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडले जाणार आहेत. प्रभाग ८ अ व ९ अ हे दोन प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहेत. तर, प्रभाग १ अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा राखीव आहेत. ९ जागा या सर्वसाधारण म्हणून असणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी चारूदत्त
इंगुले यांनी दिली.

प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १- अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग २- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ३- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ४- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ५- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ६- अ- सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
प्रभाग ७- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ८- अ- अनुसुचित जाती महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग ९- अ- अनुसुचित जाती महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग १०- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00632 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top