जेजुरीत ७५ बालकलावंताचे आज एका वेळी तबलावादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीत ७५ बालकलावंताचे आज एका वेळी तबलावादन
जेजुरीत ७५ बालकलावंताचे आज एका वेळी तबलावादन

जेजुरीत ७५ बालकलावंताचे आज एका वेळी तबलावादन

sakal_logo
By

जेजुरी, ता.३ : जेजुरीतील जानाई मंदिरलगत असलेल्या जननी गणेश मित्र मंडळाला आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मेघमल्हार संगीत विद्यालयातील ७५ बालकलावंतांकडून एकाच वेळी तबला वादन कार्यक्रम सोमवारी (ता.५) आयोजित करण्यात आला आहे.
जेजुरीतील कै. अनंतराव खाडे यांनी १९४७ साली जननी गणेश मित्र मंडळाची स्थापना केलेली होती. शहरातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून याची ख्याती
आहे. रक्तदान शिबिर, जननी तीर्थकुंडाचा जीर्णोद्धार, ऐतिहासिक पुष्करणीची डागडुजी स्वच्छता, ग्रंथालय आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यावर्षी अमृतमहोत्सव साजरा करताना विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, संगीत विशारद अमोल बेलसरे, श्रीकांत जाधव,
बासरीवादक आनंदी कळसुने यांच्या मार्गदर्शनाखाली नादब्रम्ह हा कार्यक्रम होणार आहे. दगडूशेठ मंडळाचे विश्वस्त अक्षय गोडसे उपस्थित राहणार
असल्याची माहिती मंडळाचे सचिव सतीश घाडगे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष गणेश खुडे, उपाध्यक्ष अमित खोमणे, सदस्य संजय आगलावे, मयूर शेरे, प्रथमेश पांचाळ, दिनेश सटाले, तेजस घाडगे, सिद्धांत आगलावे, आर्यन घाडगे आदी नियोजन करीत आहेत.

01514

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00688 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..