योजनेच्या नूतनीकरणानंतरच जेजुरी शहराला दररोज पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योजनेच्या नूतनीकरणानंतरच 
जेजुरी शहराला दररोज पाणी
योजनेच्या नूतनीकरणानंतरच जेजुरी शहराला दररोज पाणी

योजनेच्या नूतनीकरणानंतरच जेजुरी शहराला दररोज पाणी

sakal_logo
By

जेजुरी, ता. ७ : जेजुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाझरे धरणावरील (मल्हार सागर) पाणी पुरवठा योजनेचे पंप बदलणे व जलवाहिनी दुरुस्ती झाल्यानंतरच जेजुरी शहराला दररोज अथवा दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल. त्यासाठी सदर कामाच्या प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी प्रस्तावित केल्याचे जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
मनसचे पुरंदर तालुकाध्यक्ष उमेश जगताप यांनी नाझरे धरण भरले असताना जेजुरी शहरासाठी दररोज पाणी का मिळत नाही? असा पालिकेला पत्राद्वारे विचारले होते. त्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी पत्र देऊन सध्य स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जेजुरी शहरासाठी नीरा नदीवरून मांडकीची तातडीची योजना व नाझरे धरणावरील जुनी पाणीपुरवठा योजना आहेत. मांडकी तातडीची योजना नादुरुस्त असल्याने व वीजबिल थकल्याने जेजुरी शहराला पाणीपुरवठा होत नाही. सध्या नाझरे धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या योजनेचे पंप बदलणे व जलवाहिनी दुरुस्ती करणे, हे काम होणे गरजेचे आहे. त्यानंतर जेजुरी शहराला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होईल. त्यासाठी या योजना नूतनीकरणासाठी प्रस्तावित आहे.
दरम्यान, ज्या भागात पाणी मिळत नाही, अथवा पाण्याची टंचाई आहे. त्याबाबत टॅंकर तरी सुरु करावेत, अशी मागणी उमेश जगताप यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00698 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..