मावडी कडेपठारमध्ये मोफत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावडी कडेपठारमध्ये
मोफत आरोग्य शिबिर
मावडी कडेपठारमध्ये मोफत आरोग्य शिबिर

मावडी कडेपठारमध्ये मोफत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

जेजुरी, ता. २७ ः मावडी कडेपठार (ता. पुरंदर) येथील प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात ७०० हून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.


या शिबिरामध्ये अमेरिका, न्यूयॉर्कवरून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून औषधोपचार देण्यात आले. शिबिरामध्ये हाडांचे आजार, मधुमेह तपासणी, इसीजी, हिमोग्लोबिन, सर्दी, ताप, खोकला, वजन इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्री चाचर यांनी पुढाकार घेतला होता.
संस्थेचे सचिव कुलदीप चाचर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी विक्रम सस्ते, तेजस चाचर, विकास चाचर, राहुल भोंगळे,
दादासाहेब पांडे, विक्रम जगताप, बाळासाहेब देशमुख, सदाशिव जगताप, विनायक पांडे, रामदास भामे, नवनाथ कुंजीर, नाना गायकवाड, अमोल चाचर, सुरेश खरात, नागेश खोमणे, विशाल पवार सचिन गायकवाड, आदित्य चाचर, विराज गायकवाड, राजेंद्र पोटे, उमेश देशमुख,
बी. एन. जगताप आदींचे सहकार्य मिळाल्याचे आकाश चाचर
यांनी सांगितले.
--------------------------