ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी सेवा संघातर्फे
मुख्यमंत्र्यांना निवेदन
ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By

जेजुरी, ता. १२ ः अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत राणे व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पुरंदर तालुका व जवळार्जुन गावामधील विकास कामांच्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

जवळार्जुन गावातील राणेवस्ती एरंडी मळा- माळवाडी रस्ता व्हावा, पुरंदर उपसा सिंचन योजनेत जवळार्जुन या गावाचा समावेश करावा, तसेच जवळार्जुन गावातील नऊ नंबर चिमणीपर्यंत संग्राम पेट्रोलियम पुठ्ठा कंपनी येथून पुरंदर उपसा सिंचन योजनेची पाइपलाइन करण्यात यावी, पुरंदर उपसा योजनेमुळे जवळार्जुन, मोरगाव, आंबी, मावडी क.प. या गावांना बाराही महिने पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध
होऊ शकेल, गुंजवणीचे पाणी पुरंदरला मिळावे, आदी बाबी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.