जेजुरीतून पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीतून पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडा
जेजुरीतून पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडा

जेजुरीतून पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडा

sakal_logo
By

जेजुरी, ता.२२ : जेजुरीस भेट देणारे भाविक तसेच औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसीमध्ये रेल्वे स्थानक द्यावे. याशिवाय पुरंदरहून पुणे आणि कोल्हापूर बाजारपेठेत भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादने पोहोचवण्यासाठी पॅसेंजर रेल्वेला मालगाडीच्या बोगी जोडव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार सुळे यांनी ही मागणी केली आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्रासह येथे मोठी औद्योगिक वसाहतही आहे. यामध्ये हजारो कामगार काम करतात. पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडल्यास कामगारांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या दररोज दोन पॅसेंजर पुणे आणि कोल्हापूरसाठी धावत आहेत.

१. पुणे ते लोणंद लोकल सेवा मंजूर
२. कामगारांना एमआयडीसी परिसरातच उतरण्याची सोय
३. जेजुरी एमआयडीसी परिसरात एक स्टेशनची गरज
४. कोल्हापूरसह इतर ठिकाणी शेतीमाल नेण्यास उपयुक्त
५. पर्यटनासह राज्यभरातील भाविकांनी

दररोज होणारी वाहतूक
४....ट्रक कांदा (हंगामानुसार)
६....टेम्पो भाजीपाला
५०००.... कामगार

घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार
पुरंदर तालुक्यातून भाजीपाला तसेच फळे-फुले आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर पुणे तसेच कोल्हापूर बाजारात जातात. तथापि येथून जाणाऱ्या पॅसेंजर गाडीला मालवाहतुकीचे डबे जोडलेले नसल्याने शेतकऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. परिणामी त्यांना प्रवासखर्चच मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.

पॅसेंजर गाडीला मालवाहतुकीचे डबे जोडले तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी खर्चात व सहज पुणे आणि कोल्हापूर येथे पोहोचविणे शक्य होईल. तरी या गाडीला डबे जोडण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक विचार करावा.
- सुप्रिया सुळे, खासदार